BJP
BJP  Saam Tv
मुंबई/पुणे

भाजपचे सर्वच आमदार मुंबईकडे रवाना; 5 वाजता बैठक

लक्ष्मण सोळुंके

मुंबई - राज्यातील सर्व भाजपच्या (BJP) आमदारांना तातडीने मुंबईत दाखल होण्याची ताकीद देण्यात आली आहे.आज दुपारी 12 पर्यंत सर्वच भाजपा आमदारांना मुंबईत (Mumbai) दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,आमदार संतोष दानवे,आमदार नारायण कुचे यांच्या मराठवाड्यातील आणि विदर्भातील भाजपा आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे.

हे देखील पाहा -

आज या आमदारांची हॉटेल प्रेझिटेंट मध्ये भाजपच्या सर्वच आमदारांची आज 5 वाजता तातडीने बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपा कडून सत्ता स्थापन करण्यासाठी मोठ्या हालचालींना आता सुरवात झाली आहे. बंडखोर आमदार ही उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यात राज्यपालाकडून उद्याच सरकारने बहुमत सिद्ध करा अस पत्र काढलं असताना आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तर भाजपकडून मोठ्या हालचालींना वेग आल्याचा दिसत आहे. जालन्यातील भाजपचे बाबनराव लोणीकर,संतोष दानवे, नारायण कुचे मुबईत दाखल झाले आहेत त्यांच्या सोबत मराठवाड्या सह विदर्भातील सर्वच भाजपा आमदार मुंबईत दाखल होताना दिसत आहे. या आमदारांना आज 12 पर्यंत मुंबईत दाखल होण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याची माहिती ही समोर येत आहे.

पाच वाजता होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत काय निर्णय होतो. बंडखोर आमदारांसह किती अपक्ष आमदार भाजपच्या गळाला लागतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला आता वेगळे वळण लागले आहे. बंडखोर आमदारांच्या मागे भाजपचा हात असल्याचं बोललं जातं असताना भाजपकडून सत्ता स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT