maharashtra navnirman sena demolished illegal tadi shop in vadgaon Saam Digital
मुंबई/पुणे

MNS News : बहुचर्चित ताडी दुकानावर मनसेने चालविला जेसीबी (पाहा व्हिडिओ)

वडगाव शहरात दर गुरुवारी आठवडे बाजार भरताे. पेशवेकालीन तळ्याजवळ ताडी दुकान असल्याने मद्यधुंद अवस्थेत वावरत असणाऱ्या मद्यपींचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

दिलीप कांबळे

Mavla News :

मावळच्या वडगाव शहरात गेली अनेक वर्षे सुरू असलेले ताडी विक्रीचे दुकान प्रशासकीय कारवाईची वाट न पाहता माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी थेट मनसे स्टाईलने जेसीबीच्या सहाय्याने उद्धस्त केले. पेशवेकालीन तळ्याजवळ गेली अनेक वर्षे एका पत्र्याच्या शेडमध्ये ताडी विक्रीचा धंदा अविधरित्या सुरू होता. (Maharashtra News)

वडगाव शहरात दर गुरुवारी आठवडे बाजार भरताे. पेशवेकालीन तळ्याजवळ ताडी दुकान असल्याने मद्यधुंद अवस्थेत वावरत असणाऱ्या मद्यपींचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे संबंधित धंदा तात्काळ बंद करावा, तसेच दुकान मालकाचा परवाना बंद करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.

दरम्यान, संबंधित ताडी विक्री दुकानाच्या परवान्याबाबत म्हाळसकर यांनी चौकशी केली असता नगरपंचायत प्रशासनाने संबंधित दुकानात ना हरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी किंवा कोणतीही नोंद नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला परवाना सन २०२२ मध्येच संपुष्टात आला असल्याचे निदर्शनास आले होते..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT