Maharashtra Nagar Parishad Result Saam Tv
मुंबई/पुणे

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

Maharashtra Nagar Parishad Result Update News : निवडणूक मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याने ईव्हीएम सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ईव्हीएम हटाव सेनेने छेडछाडीची शक्यता व्यक्त करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

Alisha Khedekar

  • मतमोजणी उशिरा करण्याच्या निर्णयामुळे वाद निर्माण

  • ईव्हीएम हटाव सेनेने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

  • ईव्हीएम दीर्घकाळ ठेवणे धोकादायक असल्याचे मत

  • जनतेचा विश्वास डळमळू नये यासाठी तत्पर मतमोजणीची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतमोजणी उशिरा करण्याच्या निर्णयावर ईव्हीएम हटाव सेनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २ डिसेंबरला झालेल्या काही नगरपरिषदेच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला लागणार होता. मात्र नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार आता सर्व परिषदेची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने काही नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित करत नव्याने २० डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत मतदानानंतर तब्बल १८ ते २० दिवस ईव्हीएम मशिन्स ठेवून ठेवावी लागणार असल्याने त्याची सुरक्षा आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ईव्हीएम हटाव सेनेचे पदाधिकारी अमित उपाध्याय यांनी म्हटले आहे.

मतदान होऊन एवढ्या दिवस मशीन न सील करता किंवा जनतेच्या देखरेखीशिवाय गोदामात ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याची दाट शक्यता निर्माण होते,असा गंभीर आरोप उपाध्याय यांनी केला.

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमची वाहतूक, साठवण आणि सुरक्षा याबाबत नियम असले, तरी प्रत्यक्षात या मशिन्सवर नागरी पाहणी नसते. त्यामुळे दीर्घकाळासाठी ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएमवर शंका निर्माण होणे साहजिक असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. दरम्यान २१ डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल काय लागणार आणि नगराध्यक्ष पदावर कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT