Maharashtra Monsoon Session Saam Tv
मुंबई/पुणे

वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के; उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाची घोषणाबाजी

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच वादळी झाली आहे. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आज शिंदे गटातील आमदारांनी आज थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत होते. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळाले. 'वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के असा घोषणा शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात दिल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने-सामने आल्याचे दिसले.

सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला. आई-बहिणींनीवरुन शिवी दिली असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यामुळे विधान भवना बाहेर एकच गोंधळ निर्माण झाला होता. (Maharashtra Monsoon Session)

सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या: अजित पवार

महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT