SSC, HSC Result Canva
मुंबई/पुणे

Maharashtra HSC result 2024 : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी; ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Maharashtra HSC result 2024 declared : बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दुपारी १ वाजता बारावीचा निकाल पाहू शकतात.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे.

बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दुपारी १ वाजता पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिली. बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २३ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला.

बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी देखील मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं.

बारावीच्या परीक्षेत एकूण ९५.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यात यंदा कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के इतका सर्वात कमी निकाल लागला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नेत्यांच्या फोडाफोडीवरून भाजप-शिवसेनेचा वाद पेटला, पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा, कल्याणमध्ये महायुतीत मिठाचा खडा

IPL 2026 Auction: मुंबईकर पृथ्वी शॉला पुन्हा झटका, IPL ऑक्शनमध्ये राहिला अनसोल्ड

Maharashtra Live News Update: राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, कोर्टाने शिक्षा ठेवली कायम

ऑनलाइन शॉपिंग करताय सावधान! मागवलं सोनं, आलं १ रुपयाचं नाणं|VIDEO

Genelia Deshmukh: अभिनेत्री जेनेलिया देशमुखने ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, सौंदर्य पाहून तरुणाई घायाळ

SCROLL FOR NEXT