Maharashtra News Update SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra News : दिवाळीआधीच गोड बातमी! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी मिळाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांना पगार देण्यात येणार आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी दिली आहे. दिवाळीआधीच सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन आणि निवृत्तीधारकांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. (Maharashtra State Employee)

राज्यात सत्तेत आल्यापासून निर्णयांचा धडाका लावणाऱ्या CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीआधीच मोठी गोड बातमी दिली आहे. (Latest Marathi News)

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत आहे. सणासाठी म्हणून राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.

वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT