राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घेतला निर्णय. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने याशी संबंधित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात नायब तहसीलदार, कारकून पद कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर आता काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, ''शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे.''
नाना पटोले म्हणाले की, ''जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसिलदार व नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल.'' (Latest Marathi News)
दरम्यान, यावर बोलताना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ''तहसीलदार नायब तहसीलदार नवीन पदासाठींची ही जाहिरात नाही तर तहसीलदार, नायब तहसीलदार या या कामाचा अनुभव असलेल्या लोकांसाठी ही जाहिरात आहे. या पदभरतीसाठी भारताच्या केंद्र सरकारचे मान्यता सुद्धा घेतलेली आहे.''
ते म्हणाले, भूसंपादन विभागासाठी हे कंत्राटी तहसीलदार व नायब तहसीलदार या पदांसाठीची जाहिरात काढण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काची जी रक्कम असेल ती वेळेवर मिळावी, प्रलंबित असलेले जे शेतकऱ्यांचे निर्णय आहेत ते वेळेवर व्हावेत, हा या पदांच्या भरती मागचा मुख्य उद्देश आहे.
आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, अतिरिक्त कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ घेण्याचे आपल्याला अधिकार आहे. त्याचा एक फार्मूला भारत सरकारने ठरवून दिलेला आहे. केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतरच ही जाहिरात करण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.