सूरज मसुरकर, मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करणे सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. (Latest marathi News)
प्रशासनाकडून पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सनदी अधिकारी सौरभ राव, अनिल एम. कवडे, डी.के.खिल्लारी इत्यादी अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. IAS सौरभ राव , (2003) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
2. IAS अनिल एम. कवडे, (2003) आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. IAS अनिल पाटील (2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. IAS डी.के. खिल्लारी (2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. IAS राहुल गुप्ता (2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव, सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, छत्रपती संभाजी नगर
6. IAS मुरुगनंथम एम (2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
7. IAS यशनी नागराजन ( 2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.