Sharad Pawar/ Shivaena Saam TV
मुंबई/पुणे

'राज्य सरकार कायद्याने स्थापन झालंय, त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही'

'दोन तृतीयांश आमदार एकत्र झाले तरी कुठलाच राजकीय निर्णय होत नाही. काही लोकं म्हणाले ते भाजपमध्ये विलीन होतील. मात्र, भाजपवाले त्यांना घ्यायला तयार आहेत की नाही माहीत नाही.'

अजय दुधाणे

अंबरनाथ : महाराष्ट्रात एवढा मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला असताना २ दिवसांपूर्वी मंत्री अनिल परब यांना नोटीस आली, ते चौकशीला गेले होते. आज बातमी आली की संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही नोटीस आली असून त्यांनाही चौकशीला बोलावण्यात येईल. मात्र, माझी विनंती आहे की महाराष्ट्रातलं सरकार कायद्याने स्थापन झालेलं सरकार आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा ज्या कोणी अदृश्य शक्ती प्रयत्न करत असतील, त्यांचे प्रयत्न अजिबात यशस्वी होणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केलं, ते अंबरनाथ मध्ये बोलत होते.

ते पुढं म्हणाले, या अदृश्य शक्तींच्या माध्यमातून मोठ्या निधीचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात चर्चा आहे की ५० कोटी प्रत्येक आमदाराला मिळाले आहेत. हे खरं की खोटं माहीत नाही. परंतु देशात इन्कम टॅक्स विभाग आहे, देशामध्ये ED आहे. यांनी छापे टाकून अशाप्रकारे जर पैशांचा वापर सरकार पाडण्यासाठी झाला असेल, तर हा ब्लॅक मनी कुणी पुरवला? हे शोधून काढावे आणि जर कुणी असे पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी देखील तपासे यांनी केली.

हे देखील पाहा -

ते पुढे म्हणाले, 'ज्यांनी बंड केला त्यांनी गुवाहाटीत (Guwahati) जाऊन सांगितलं, की बाळासाहेबांच्या विचारांवर चालत नव्हते म्हणून आम्ही बंड केलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले, हिंदुत्त्वाचा विसर पडला म्हणून, तिसऱ्या दिवशी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) वाढत आहे आणि आम्हाला दाबत आहे म्हणून बंड केलं.'

दोन तृतीयांश आमदार एकत्र झाले तरी कुठलाच राजकीय निर्णय होत नाही. काही लोकं म्हणाले ते भाजपमध्ये विलीन होतील. मात्र, भाजपवाले त्यांना घ्यायला तयार आहेत की नाही माहीत नाही. तसंच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी २ वेळा फोनवर चर्चा झाली. आता मनसेमध्ये हे आमदार जातात का? याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे. बाळासाहेबांच्या नावाने ज्यांनी मतं मागितली, ती लोकं बाळासाहेबांचा विचार सोडून गेलेल्या लोकांकडे जातात का? हे पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहेत असंही महेश तपासे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

SCROLL FOR NEXT