Shinde Government Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde Government : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

शिंदे सराकरने छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shinde Government News : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील एका वक्तव्याने चांगलंच राजकारण तापलं होतं. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे सराकरने छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

राज्यात आता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. 14 मे रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Maharashtra Government) निर्णय महत्वाचा घेतला आहे. यापूर्वी थोर पुरुषांच्या जयंतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा समावेश नव्हता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. २०२३ या वर्षापासून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक की 'धर्मवीर'वरून यावर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं.

राज्यात 'धर्मवीर'वरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'धर्मवीर'वरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'धर्मवीर'वरील वादानंतर शिंदे सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर करण्याच्या निर्णयाचं नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT