MAHARASHTRA GOVERNMENT TRANSFERS 8 SENIOR IAS OFFICERS IN MAJOR ADMINISTRATIVE RESHUFFLE Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Transfers : प्रशासनात मोठा बदल! ८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे कोणाची होणार नियुक्ती? वाचा

Maharashtra IAS Transfers Update News : महाराष्ट्र सरकारने ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध विभागांना नवे अधिकारी मिळाले आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

  • मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी बदल्या लागू

  • लवकरात लवकर बदल्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ८ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमुळे अनेक महत्त्वाच्या विभागांना नवीन अधिकारी मिळणार असून विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने बुधवारी महाराष्ट्र प्रशासनात महत्त्वाचे बदल केले. ८ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमध्ये पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईस्थित महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

तसेच, श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील स्वयंरोजगार, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यांचा विशेष भर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव पंकज देवरे यांचीही बदली करण्यात आली असून त्यांची महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) सह महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांमध्ये त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत.

याशिवाय, जगदीश मिनियार यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षा लड्डा यांच्याकडे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली असून महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीवर त्यांचे लक्ष राहणार आहे. डॉ. मंजिरी मनोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर निलेश सागर यांची पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध विभागांतील प्रशासन अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासन विभागाने या बदल्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

Rajesh Sharma: शूटिंगदरम्यान चावला विषारी किडा; प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मांची प्रकृती गंभीर, AICWA ने केली चौकशीची मागणी

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT