Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: अर्थ खाते अजित पवार गटाकडे जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar News: एका पत्रकाच्या (वित्त) खात्यावर कोणत्याही मंत्र्यांचं नाव नसल्याने हे खाते अजित पवार गटाकडे जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rashmi Puranik

Mumbai News: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी उपसमिती नेमून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकावर उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर सुधीर मुनगंटीवार(वने),उदय सामंत(उद्योग), अतुल सावे (सहकार) या मंत्र्यांची नावे आहेत. मात्र, (वित्त) खात्यावर कोणत्याही मंत्र्यांचं नाव नसल्याने हे खाते अजित पवार गटाकडे जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Marathi News)

उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाचं एक परिपत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या परिपत्रकात देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे (उर्जा) खाते लिहिलं आहे. तर त्याच्याखाली (वित्त) खात्यापुढे कोणाचेही नाव नाही. मात्र, वित्त अर्थात अर्थ खाते हे अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

परिपत्रकाची का होतेय चर्चा ?

राज्य सरकाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमली आहे. या उपसमितीत शिंदे-फडणवीस सरकारच्या ५ मंत्र्यांची नावे लिहिण्यात आली आहे.

या उपसमितीचे अध्यक्ष उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर इतर सदस्यांची देखील नावे या उपसमितीत आहेत. या सदस्यांमध्ये सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार(वनमंत्री),उदय सामंत(उद्योगमंत्री), अतुल सावे (सहकारमंत्री) ही नावे आहेत. तर वित्त मंत्री या समोर कोणतंही नाव लिहिण्यात आलेलं नाही. त्यामुळे वित्त अर्थात अर्थ खाते अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

SCROLL FOR NEXT