load shedding in smart cities Saam tv
मुंबई/पुणे

स्मार्ट सिटीत विजेचा खेळखंडोबा; मोठ्या शहरांमध्येही अघोषित लोडशेडिंग, VIDEO

load shedding in smart cities : भर उन्हात, आणि घामाच्या धारा निघणाऱ्या रात्रीत राज्यभरात अघोषित लोडशेंडिग सुरु झालंय का? असा सवाल उपस्थित होतोय. याच अघोषित लोडशेडिंगच्या विरोधात मध्यरात्री नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि काय घडलं पाहा.

Snehil Shivaji

पाहिलात या महिलेचा आक्रोश...हिचा जाच ना नवऱ्यानं केलाय ना सासरच्यांनी....हा जाच केलाय महावितरणनं..... मुंबईच्या शेजारी... देशातील सर्वात नियोजित शहरांपैकी एक शहर नवी मुंबई.. याच नवी मुंबईत कोट्यवधी रुपये मोजून घरं घेऊन ईएमआय फेडत जगणाऱ्या सर्वसामान्यांचं जगणं अक्षरशः अंधारात गेलंय. दिवसभर काम, धक्काबुक्कीचा लोकल प्रवास आणि त्यानंतर वीज नसलेल्या घरात रात्री झोपणं नवी मुंबईकरांच्या नशीबी आलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला हा छळ इतक्या भीषण उकाड्यात नागरिकांनी सहन केला. मात्र नागरिकांचा संयम सुटला आणि पोराबाळांसह अर्ध्या रात्री हजारो महिला आणि पुरुषांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, घटनास्थली पोलीस दाखल झाले. मात्र भडकलेल्या जनतेने आपला मोर्चा थेट पोलीस ठाण्याकडे वळवला आणि चौकात ठिय्या मांडून रस्ता रोको केला. एकीकडे नवीमुंबईतल्या कामोठ्यात हजारो नागरिक रस्त्यावर आलेले असतांना उलव्यात झोप पूर्ण न झाल्याची व्यथा मांडताना एका लाडक्या बहिणीला अश्रू अनावर झाले.

त्यानंतर संयमाचा बांध फुटलेल्या या महिलेनं अंथरूण-पांघरूण घेऊन झोपण्यासाठी थेट महावितरणच्या कार्यालयच गाठलं. अधिकाऱ्यांना धारेवर धरलं...

लाडक्या बहिणी भर मध्यरात्री कच्चीबच्ची मुलं कडेवर घेऊन वीजेसाठी रस्त्यावर रडतायेत, याचं सोयरसुतक महावितरणला आहे का? हा संतापाचा उद्रेक नवी मुंबईत झाला पण, ठाणे, डोबिंवली, कल्याण, वसई विरार, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात सध्या अघोषित लोडशेडिंग सुरूये. स्मार्ट मीटरच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिलं आकारणारं आणि वेळेवर बिल न दिल्यास कनेक्शन तोडणाऱ्या महावितरणच्या नियोजनाचा फ्युज मात्र उडालाय.

इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम करा, फिरायला जाऊ नका असे सल्ले देशवासियांना मिळतात पण याच देशवासियांना किमान मुलभूत सुविधांसाठी रात्रीअपरात्री रस्त्यावर येऊन भांडावं लागतं...त्यामुळे महावितरणनं यावर तोडगा काढणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : कोणाला धनलाभ, कोणाला मनस्ताप? वाचा मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुण्यात कॉकरोज पार्टीचे आंदोलन होणार, अभिजीत दिपकेंनी दिली माहिती

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT