Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

मास्क वापराच! मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७ हजारांपार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १०३६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा ७४२९ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.

मुंबईसह राज्यातील दैनंदिन कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मास्क सक्तीचा नसला तरी, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. मास्क वापरण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही केले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १०३६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ७४२९ वर पोहोचली आहे.

याच कालावधीत कोरोनातून (Corona) ३७४ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ७७,३८,९३८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०३ टक्के इतका आहे. तर कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे.

मुंबई विभाग - मुंबई महापालिका, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, पालघर, वसई विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका आदी क्षेत्रांत एकूण ९३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी क्षेत्रांत १२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

पुणे विभाग - पुणे, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका आणि सातारा आदी भागांत ७२ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी भागांत ३ नवे रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबाद विभाग- औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिक आदी परिसरात नवे २ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका आदी क्षेत्रात ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी क्षेत्रांत ३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली या भागांत पाच नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी RSSचा सदस्य, संघटनेसाठी पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक; निवृत्तीच्या भाषणात न्यायाधीश चित्तरंजन दास नेमकं काय म्हणाले?

Today's Marathi News Live : किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

Pune Crime: पुण्यात दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचं अपहरण, शेवटचे CCTV फुटेज आलं समोर

Nagpur RTE News : नागपूरमध्ये शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र, गुन्हा दाखल

Ginger Side Effects : उन्हाळ्यात अद्रक खाताना १० वेळा विचार करा; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT