Uddhav Thackeray 
मुंबई/पुणे

विश्वासात न घेतल्याने नामुष्की ओढवली; ठाकरेंचा माेदींना टाेला

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी कृषी कायदाबाबत Farm Laws To Be Repeal माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत विराेधी तसेच समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सरकारला उपरती झाल्याने कृषी कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो अशी भावना व्यक्त केली.

ठाकरे यांनी ट्विट करुन केंद्राने असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन देशहिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने आजही सुरूच आहे. सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले. पण अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना त्रिवार वंदन. या आंदोलनात प्राणास मुकलेल्या वीरांना मुख्यमंत्री ठाकरेंनी अभिवादन केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT