CM Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde Sabha : खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, उद्धव ठाकरे निशाण्यावर?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानात आज जाहीर सभा आहे.

सुरज सावंत

CM Eknath Shinde Khed Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानात आज जाहीर सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे.  (Latest Marathi News)

सभा स्थळी हजारोच्या संख्येने खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. भव्य स्टेज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचा भाषण हे ऐकता यावं, पाहता यावं या अनुषंगाने एलईडी स्क्रीन देखील उभारण्यात आलेले आहेत. मैदानाच्या चारही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच मैदानात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय उत्तर देणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत एकनाथ शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 अमदारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टिकेनंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Jerks: झोपेत असताना अचानक झटका का लागतो?

Maharashtra News Live Update: माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे 'हे' ५ पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका

Ragda Pattice Recipe : ठेलेवाला चाट विसरा! घरच्या घरी बनवा चटपटीत आणि क्रिस्पी रगडा पेटिस

कॅबिनेट मंत्राचा OSD आमदार होणार? उदय सामंतांचा विश्वासू शिलेदार विधान परिषदेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT