Shinde government news  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; पाहा, कोणाला मिळालं कुठलं खातं?

साऱ्या जनतेचे लक्ष शिंदे सरकारमध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल, याकडे लागले होते. जनतेचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले. बंडाळीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला. राज्यातील राजकारणात बंडाळीनंतर तब्बल ३८ दिवसांपेक्षा अधिक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता साऱ्या जनतेचे लक्ष शिंदे सरकारमध्ये कोणाला कुठलं खातं मिळेल, याकडे लागले होते. जनतेचे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. (Shinde government news)

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ खाते आहेत. तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

राधाकृष्ण विखे-पाटील -

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित-

आदिवासी विकास

गिरीश महाजन-

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील-

पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे-

बंदरे व खनिकर्म

संजय राठोड-

अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-

कामगार

संदीपान भुमरे-

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत-

उद्योग

प्रा.तानाजी सावंत-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण -

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार-

कृषी

दीपक केसरकर-

शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे-

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई-

राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा-

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT