Maharashtra Cabinet Expansion Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Expansion Formula: मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला! CM शिंदे आज मोठी घोषणा करणार? 'वर्षा'वर रात्री काय घडलं?

Maharashtra Cabinet Expansion: या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maha Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक झाली.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आणि खातेवाटपाबाबत तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करण्याची शक्यता असून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

दरम्यान, मंत्रीपदासाठी भाजपसह शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अनेक इच्छुक आमदारांनी देव पाण्यात ठेवले असून, कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असली, तरी अजून त्यांना खातेवाटप झाले नाही.

आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खातेवाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जात आहे. अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT