Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar will get Finance Ministry Eknath Shinde Group tension increases Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics News: शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी; अर्थ खातं अजित पवारांकडेच? दिल्लीतील बैठकीत काय ठरलं?

Ajit Pawar News: शिंदे गटातील आमदारांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. युती सरकारमधील अर्थ खातं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rashmi Puranik

Maharashtra Politics Ajit Pawar News: भाजपने सर्वांनाच धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाला युती सरकारमध्ये सहभागी करून घेतले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

अजित पवार गटाने काही महत्त्वाच्या खात्यांची खाती मागितली आहे. ज्याला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या गटाला महत्वाची खाती विशेषत: अर्थ खातं देऊन नका, अशी भूमिका शिंदे गटातील आमदारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे यावर बड्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदारांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. युती सरकारमधील अर्थ खातं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांना सुरूवातीपासूनच अर्थ खात्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे आता त्यांना हे खातं नाकारून चालणार नाही, असं मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं.

मात्र, अजित पवार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त निधी देत असून शिवसेनेला संपवण्याचं काम चालू असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी बंड केलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये बरोबर नको, अशी ठाम भूमिका शिंदे गटाच्या आमदारांनी घेतली होती.

आता तेच अजित पवार राष्ट्रवादी पक्ष बरोबर घेऊन सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आणि खातेवाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या गटाने अर्थ व नियोजन, महसूल, जलसंपदा आणि सहकार या चार महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलेली आहे. याच संदर्भात शाहांसोबत चर्चा झाल्याचे समजते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT