Eknath Shinde, Devendra Fadnvis Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील 'या' मंत्र्यांना मिळणार मोठी खाती; वाचा संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:कडे गृह आणि अर्थ खाते ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता खाते वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद सोडले आहे, त्यामुळे आता महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

खाते वाटपाची संभाव्या यादी सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वत:कडे गृह आणि अर्थ खाते ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुधीर मुनगंटीवर यांना उर्जा खाते, विखे-पाटील यांना महसूल खाते शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना उद्योग खाते मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही असतील संभाव्य खाती, सूत्रांची माहिती अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही

1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)

2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ

3) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, सहकार

4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन

5) चंद्रकांतदादा पाटील - सार्वजनिक बांधकाम

6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास

7) गिरीश महाजन - जलसंपदा

8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

9) दादा भुसे- कृषी

10) संजय राठोड- ग्राम विकास

11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय

12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी

13) उदय सामंत - उद्योग

14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री

15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण

16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास

17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण

18) अतुल सावे - आरोग्य

19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क

20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय

दरम्यान, शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आले. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील आमदारांसोबतच्या बैठकीत या नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT