Rickshaw drivers up in arms against bike taxis in pune and nashik  saam tv
मुंबई/पुणे

Bike taxi ban : बाईक टॅक्सी आणि वाहतूक निर्बंधांविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार; पुण्यात संप, नागपुरात आक्रोश मोर्चा

transport department Maharashtra : बेकायदेशीर बाईक - टॅक्सींमुळे रोजगारावर गदा येत असल्याने रिक्षाचालक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.या वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा एल्गार रिक्षाचालकांनी केला आहे.

Saam Tv

बेकायदेशीर बाईक टॅक्सी वाहतूक आणि अनधिकृत प्रवासी वाहतुकीच्या विरोधात राज्यभरातील रिक्षाचालक-मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात २३ नोव्हेंबर रोजी रिक्षाचालक संपावर जाणार असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडे, नागपुरात ई-रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात आक्रोश मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे राज्यातील रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्हा रिक्षाचालक-मालक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. पुणे शहरात सुमारे दीड लाख रिक्षाचालक-मालक असून, संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या १५ ते २० लाखांच्या घरात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. बाईक टॅक्सी कंपन्या शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

यामुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असून, चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी कंपन्यांकडून पारंपरिक रिक्षा व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपुरातही ई-रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात आंदोलन केले. शहरातील १३ प्रमुख मार्गांवर ई-रिक्षा चालवण्यास घातलेली बंदी आणि अन्यायकारक चालान कारवाईच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समिती ई-रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. व्हेरायटी चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केले.

वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा आणि ई-रिक्षाचालकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाहतूक निर्बंध आणि दंडात्मक कारवाईमुळे हजारो ई-रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Asthma : थंडीत रात्री अचानक श्वास घेण्यास होतोय त्रास? दम्याच्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' ३ चुका

Maharashtra News Live Update: नागपुरात ई-रिक्षा चालकांचा वाहतूक पोलिसांविरोधात आक्रोश मोर्चा; १३ प्रमुख मार्गांवरील बंदी उठवण्याची मागणी

Accident : मध्यरात्री थरारक अपघात, भरधाव कारची आधी ऑटोला धडक, नंतर ६ जणांना चिरडलं; आरोपी अद्याप फरार

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचा 43 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू? निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

Travel Tips :वंदे भारतमध्ये चुकून अडकलात? घाबरू नका, दंड टाळण्यासाठी जाणून घ्या हे ३ नियम

SCROLL FOR NEXT