rss nagpur  saam tv
मुंबई/पुणे

'पीएफआय'च्या निशाण्यावर RSS-BJP नेते, संघ मुख्यालय; ATSच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र एटीएसच्या तपासात 'पीएफआय'बाबत धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

Mumbai News : देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर धाडसत्र राबविले. केंद्रीय तपास यंत्रणेने देशभरातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या (ATS) तपासात धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय यंत्रणा 'पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेवर लक्ष ठेवून होते. केंद्रीय तपास यंत्रणेने देशभरातील 'पीएफआय'च्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीनंतर महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती हाती लागली. 'आरएसएस आणि भाजपचे (BJP) अनेक बडे नेते पीएफआयच्या रडारवर होते. 'पीएफआय' कॅडर त्यांना टार्गेट करण्याच्या रणनीतीवर काम करत होते, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.

नागपूरचे आरएसएसचे संघ मुख्यालय देखील 'पीएफआय'च्या निशाण्यावर असल्याचा आणखी एक अधिकाऱ्याने केला आहे. अटक करण्यात आलेल्या 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या चौकशीदरम्यान 'एटीएस'ला ही माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात एनआयए, ईडी आणि एटीएसने अनेक शहरांमध्ये शोधमोहीम राबवून 'पीएफआय'च्या २० जणांना अटक केली.

PFIच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्याच घोषणा, 'साम' टीव्हीकडे व्हिडीओ; अल्ट न्यूजचा दावा खोटा

पुण्यातील 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असा दावा 'अल्ट न्यूज' या फॅक्ट चेक करणाऱ्या न्यूज पोर्टलने केला होता. मात्र हा दावा खोटा निघाला आहे. साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात ही घोषणाबाजी झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा साम टीव्हीचा दावा खरा ठरला आहे.

अल्ट न्यूज खोटा दावा का करत आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. साम टीव्हीच्या व्हिडीओ फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पोलीस देखील व्हिडीओजची तपासणी करुन कारवाई का करत नाही हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT