Cm Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Cm Eknath Shinde: आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे

Satish Kengar

Vidhan Sabha Pavsali Adhiveshan: आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. 'आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणातील ठळक 10 मुद्दे जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे

1. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका करत म्हणाले की, "लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधकांची गरज असते. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी विरोधकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधी पक्षनेत्याची निवड होणे आवश्यक होते. मात्र आजच्या इतके कधी नव्हे इतके गोंधळलेले आहेत. त्यांनी आपला आत्मविश्वास गमावलेला आहे. या अधिवेशनात सर्वांना बोलायला संधी मिळाली. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना तयारी करायला वेळ आहे."

2. मोठे उद्योग राज्यातून बाहेर जात आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका जाहीर केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची टीका झाली, मात्र श्वेतपत्रिकेत जाहीर केली. राज्यात एक लाख 18 हजार कोटींनी गुंतवणूक झाली. यामुळे गुंतवणूक राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेले आहे. दावोसमधील झालेल्या एमओयूची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.'' (Latest Marathi News)

3. शिंदे म्हणाले, ''शासन आपल्या दारी उपक्रमातून सव्वा कोटी नागरिकांना फायदा झाला. महाविकास आघाडीत अहंकारामुळे काही प्रकल्प रखडवले होते. ते प्रकल्प युतीचे सरकार आल्यानंतर मार्गी लावले. आम्ही अॅक्शन घेतो, फिल्डवर जाऊन काम करतो, हे सरकार घरी बसून काम करणारे नाही."

4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले "वर्षभर सरकार पडणार, पडणार पडणार असे म्हणत होते. दररोज नवीन ज्योतिष तयार होऊन नवीन मुख्यमंत्री होण्याची चर्चाही होत होती. यात नाना पटोलेही आघाडीवर होते. आधी १७० आमदारांचे पाठबळ होते, मात्र विकासाचा वेग पाहून अजितदादाही बरोबर आहे. त्यामुळे संख्याबळ २१५ वर जाऊन सरकार मजबूतच झाले आहे."

5. शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

6. उद्धव ठाकरे यांना टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे.''

7. राज्यातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून शेतकरी, महिला, वंचित, कष्टकरी जनसामान्यांचे हे शासन आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शासन विविध योजना राबवत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

8. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जनतेला विविध मूलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवत असून ‘शासन आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जनसामान्यांना सुलभतेने योजनांचे लाभ मिळवून देत आहे. या अंतर्गत एक कोटी तेरा लाख लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर असून मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत शंभर कोटी रुपयांचे वितरण गरजूंना करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील सर्व जनतेला 5 लाखापर्यंतचा उपचार मिळणार आहे. राज्यात ‘बाळासाहेब आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातून निशुल्क उपचार सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड काळातील उपचार प्रक्रियेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, तसेच कुणाला ही पाठिशी घातले जाणार नाही.

9. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा योजना देण्यात आली एक कोटी 69 लाख लोकांनी विम्याचे अर्ज भरलेले आहेत. सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून 60 हजार कोटी निधीला मान्यता देण्यात आली असून उद्योगांसाठी वीज दर कमी करण्यात आला आहे. बाराशे कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली आहे. केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेऊन साखर उद्योगासाठी दहा हजार कोटी आयकर माफ करण्यात आला आहे.

10. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातही भरीव उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन शाळांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा, मूल्यमापन चाचण्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना गणवेश, बूट देण्यात येणार आहेत. शिक्षकांची 30 हजार पदे भरण्यात येणार असून पुढील दोन महिन्यात भरती प्रक्रिया सुरु करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT