Maharashtra Pavsali Vidhan Sabha Adhiveshan 2024 | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Pavsali Adhiveshan: अधिवेशनात गाजणार २० मुद्दे, त्यातील ५ मुद्द्यांवर आधीच रण पेटलंय!; 'मविआ'चा मास्टर प्लान

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय.

Priya More

पावसाळी अधिवेशनाला २७ जूनपासून म्हणजे उद्यापासून सुरूवात होणार आहे. यंदाचे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये महाविका आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुतीला घेरण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session) पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे.

त्याचसोबत सरकारच्या (Maharashtra Government) चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असताना सरकार गंभीर नसल्याचे सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार -

- शेतकरी कर्जमाफी

- घाटकोपर होर्डींग्ज दुर्घटना

- दुधाला कमी भाव

- नीट परीक्षा रद्द

- बोगस बियाणे

- जास्त दरात बियाणे विक्री

- बेरोजगारी

- अटल सेतू भेगा

- शेतकऱ्याला मदत न करणे

- शेतकरीला पीक कर्ज न देणे

- कायदा सुव्यवस्था

- पोलिस भरती रद्द

- परीक्षा घोळ

- पेपर फुटी

- पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण

- महागाई

- इतर ही मुद्दे महत्त्वाचे असणार आहे.

- शक्तीपिठ महामार्ग शेतकरी विरोध

- मराठा- ओबीसी आरक्षण वाद

- ⁠पुण्यातील अंमली पदार्थ

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शेकापचे नेते जयंत पाटील, सपाचे नेते अबू आझमी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री ८ वाजता वांद्रेतील ताज लँड हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर चर्चा होणार आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT