Maharashtra Exam Paper Leak Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं; विधानभवनाबाहेर विरोधक एकवटले, सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Exam Paper Leak: "राज्यात सतत होणाऱ्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्त", असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

Satish Daud

Maharashtra Breaking News

मागील काही दिवसांपासून राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढल्या आहेत. तलाठी भरती प्रकरण ताजं असतानाच बीडमध्ये बुधवारी (ता. २८) पुरवठा निरीक्षण पदाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता. २९) विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी आंदोलन केलंय. "राज्यात सतत होणाऱ्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्त", असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक विविध मु्द्दे बाहेर काढत आहेत. अशातच पेपरफुटीच्या प्रकरणावरून गुरुवारी विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पेपरफुटीच्या घटनांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

"सर्वसामान्य विद्यार्थी मोठी मेहनत करून अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करून ते पेपर देऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात. परंतु, पैसे घेऊन परीक्षा पास करून देणारे रॅकेट या महाराष्ट्रात आहे. हे रॅकेट पेपर फोडून ते विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना विकतात. परिणामी हुशार विद्यार्थी मागे राहतात", असं अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं.

"उत्तरप्रदेशात देखील अशाच पेपरफुटीच्या घटना वाढल्या होत्या. त्यावर सरकारने तातडीने अॅक्शन घेत तेथील सर्व परीक्षा रद्द केल्या. असंच कडक पाऊल राज्य सरकारने उचलल्याशिवाय पेपरफुटी बंद होणार नाही. मात्र, माझ्याकडे माहिती आहे, की यासाठी सरकारच प्रोत्साहन देत आहे", असा गंभीर आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT