Shrikant Shinde On MVA Saam Tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde: फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मविआने मतं मिळवली, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आरोप

Shrikant Shinde On MVA: कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

लोकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवला, तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. संविधान खतरे मे, संविधान बचाव, अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून हे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं, असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी मविआवर केला आहे.

कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. या कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी लोकांच्या दिशाभूल एकदा करू शकता, वारंवार दिशाभूल होत नसते. येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला: श्रीकांत शिंदे

वरळी मतदारसंघात 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य आलं. त्यांना वाटत होतं, मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे. मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं. म्हणून 19 टक्के जे मतदान शिवसेनेला होत होतं, त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला पडलं, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT