BMC Election Saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Maharashtra politics : मुंबईत महाविकास आघाडी फुटली आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडी फुटली.

Vishal Gangurde

ऐन मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट

काँग्रेसने मुंबईत निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय

रमेश चेन्नीथला यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अधिकृत केली घोषणा

राज ठाकरे असलेल्या आघाडीत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय

महापालिका निवडणुकींच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटली. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्वबळाची घोषणा केली. ऐन निवडणुकीत महाविकास आघाडी फुटल्याने भाजपची लढाई सोपी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांचाही पश जाण्यास अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राज ठाकरे असलेल्या आघाडीत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाने मुंबईत महाविकास आघाडी फुटल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपची मुंबईसाठी रणनीती काय?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार तयारी केली आहे. मुंबईत भाजपचे २०१७ साली ८४ नगरसेवक निवडून आले होते. २०२० साली झालेल्या शिवसेना फुटीनंतर मुंबईत दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. मुंबईतील ज्या वॉर्डामध्ये ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. त्या वॉर्डामध्ये शिंदे गटाला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

मुंबईत महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर मुंबईत अजित पवार गटाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे देण्याला भाजपचा विरोध असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीत मुंबईतील २२७ जागांपैकी कोणाला किती जागा मिळणार, अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT