LPG Gas Booking New Rules News Saam Tv
मुंबई/पुणे

LPG Gas Rules : इस्रायल-इराण युद्धाची झळ स्वयंपाक घराला, एलपीजी सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल

LPG Gas Booking New Rules News : इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतात घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता एका सिलिंडरनंतर दुसरा बुकिंग करण्यासाठी १५ ऐवजी २१ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

Alisha Khedekar

  • इस्रायल-इराण युद्धामुळे ऊर्जा आयातीवर परिणाम होण्याची शक्यता

  • LPG सिलिंडर बुकिंग १५ दिवसावरून वरून २१ दिवसांपर्यंत वाढवले

  • गॅस तुटवडा टाळण्यासाठी कंपन्यांनी नियमात बदल केला

  • जागतिक तेल संकटामुळे भारतातील स्वयंपाकघर खर्च वाढण्याची शक्यता

सध्या जगात सुरु असलेल्या इस्त्राईल आणि इराणच्या युद्धाचा फटका भारतीयांच्या स्वयंपाक घराला बसला आहे. या युद्धामुळे ऊर्जा आयातीवर मोठा परिणाम होऊन घरगुती गॅसची किंमत अव्वाच्या सव्वा वाढून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच आता कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या बुकिंगशी संबंधित नियमात मोठा बदल केला आहे. आता बुकिंगची वेळ १५ दिवसांनी वाढवून २१ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच आता एक सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर डिलिव्हरीदरम्यान २१ दिवसांचं अंतर असेल.

हा नवीन नियम लागू करण्यासाठी एजन्सींचे सॉफ्टवेअर तातडीने अपडेट करण्यात आले आहे, पण बुकिंग प्रक्रिया पहिल्यासारखीच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहक पहिल्या सिलिंडरच्या खरेदीनंतर पुढील सिलिंडर लगेच बुक करू शकतात, मात्र युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात सिलिंडरचा तुटवडा भासू नये म्हणून, २१ दिवसांनंतरच बुकिंग करण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात आहे. जर हा नवीन नियम लागू झाला, तर आधीच्या सिलिंडरचा २१ दिवसांचा कालावधी संपल्यानंतरच तुम्हाला पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे.

इस्त्राईल आणि इराण युद्ध भडकलं!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर शनिवारी काही तासांत इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यात इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला भीषण आग लागली. ही आग इतकी भडकली की सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. दरम्यान हे युद्ध आणखी किती दिवस असचं सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT