Crime News, Lonavala SaamTv
मुंबई/पुणे

Lonavala News : लोणावळा ब्रिजनजीक चाकूचा धाक दाखवत सलमानसह मैत्रिणीला लुटलं; तिघांवर गुन्हा दाखल

या घटनेचा पाेलीस तपास करीत आहेत.

दिलीप कांबळे

Lonavala News : लोणावळा शहरातील सहारा पुल भागात फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक लाख बारा हजार चारशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. लोणावळा शहर पोलीसांनी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान व त्याची मैत्रिण हे काल रात्री लोणावळा ब्रिजच्या पुढे फिरायला गेले हाेते. त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तीनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच सलमान याच्या हातावर चाकूने वार करुन गंभीर जखमी (injured) केले. (Maharashtra News)

यावेळी सलमानचा आय फोन (iphone) व त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची दोन तोळ्याची साखळी, चांदीची अंगठी असा एकूण एक लाख बारा हजार चारशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. या घटनेची माहिती त्यांनी लोणावळा शहर पोलीसांना दिली. त्यानूसार लाेणावळा शहर पाेलीस ठाण्यात तीन अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पाेलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT