The deserted road near Datt Mandir, Lonavala, where the woman was found after the horrific incident. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Lonavala GangRape Case : लोणावळ्यात कारमधून एका तरुणीवर तिघा नराधमांनी निर्जन रस्त्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Namdeo Kumbhar

  • लोणावळ्यात तिघा तरुणांनी कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

  • घटना तुंगार्ली गावाजवळच्या निर्जन रस्त्यावर घडली.

  • पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत डांबून अत्याचार केला

  • पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी पसार आहेत.

दिलीप कांबळे, लोणावळा प्रतिनिधी

Lonavala girl gangraped inside car by 3 men at night : लोणावळ्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तीन तरूणांनी कारमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. निर्जन रस्त्यावर तरूणांनी तरूणीला कारमध्ये खेचलं अन् सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला तात्काळ अटक केली असून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. लोणावळ्यातील या घटनेनंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

लोणावळा शहरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरगाव येथील दत्त मंदिर दत्त सोसायटी शेजारील एका निर्जन रस्त्यावर एक तरुणी संशयास्पद रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी या तरुणीला शेजारी असलेल्या एका मंदिरात ठेवले होते. अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरूणीवर प्रथम वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी तरूणीचा जबाब नोंदवला.

तरूणीवर 25 ते 30 वयोगटातील तीन अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये जबरदस्तीने ओढलं. तिघांनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही लोणावळा परिसरातील आहे. तरूणी तुंगार्ली गावातील एका रस्त्याने जात होती, त्यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तोंड दाबून गाडीमध्ये जबरदस्तीने डांबले. तरूणांनी तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर हात बांधून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना समोर येताच लोणावळ्यात एकच खळबळ उढाली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. लोणावळा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Voter ID Scam in South Mumbai: मुंबईच्या सोसायटीमध्येही व्होटचोरी? राहणार फुटपाथवर, पत्ता सोसायटीचा

'PM केअर फंडातून कर्जमाफी द्या' शेतकरी कर्जमाफीवरुन ठाकरेंनी घेरलं

Shocking : नणंद देखण्या वहिनीच्या प्रेमात, घर सोडून दोघी पळाल्या; WhatsApp चॅट्समुळे सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT