lonavala, pune mumbai express way, accident, hospital saam tv
मुंबई/पुणे

'हा' निर्णय झाल्यास पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघातग्रस्ताचा वाचेल जीव; लाेणावळाकरांचा दावा

ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होत आहे. मात्र अपघातानंतर दिरंगाई झाली तर रुग्णाचा जीव जाण्याचीही भीती आहे.

दिलीप कांबळे

Pune Mumbai Express Way : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच त्यांचे जीव वाचावेत यासाठी लोणावळ्यातील वलवण येथे असलेल्या कुसगाव टोलनाक्याजवळील (toll plaza) जागेत ट्रॉमा केअर सेंटर उभारावे अशी मागणी लोणावळ्याचे (lonavala) माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली.

काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. अपघातानंतर त्यांना सुमारे एक तास तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस वे वरील अपघात आणि त्यात होणारे मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एक्सप्रेस वेवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या बोरघाटात एक्सप्रेस वे वर रुंदीकरण, दुरुस्तीसह मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळेही अपघातामध्ये वाढ झाली आहे. अपघातामधील जखमींना वेळेमध्ये योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो असं श्रीधर पुजारी यांनी नमूद केलं. ते म्हणाले अपघात झाल्यास रुग्णांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय, सोमाटने, निगडी येथील खाजगी रुग्णालयाचा पर्याय होता. ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होत आहे. मात्र अपघातानंतर दिरंगाई झाली तर रुग्णाचा जीव जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे जखमींवर वेळीच उपचार होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

वलवन येथील एक्सप्रेस हायवेवर कुसगाव टोल नाक्याच्या शेजारील रस्ते विकास महामंडळाची वास्तू अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. प्रशस्त आणि मार्गालगत असल्याने या वास्तूचा सोईस्कर वापर होऊ शकतो.

हजारो नागरिकांना या मार्गावर केवळ वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मध्यवर्ती असलेला लोणावळा शहरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर होणे गरजेचे आहे असे मत श्रीधर पुजारी आणि सुरेखा जाधव यांनी व्यक्त केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT