Mahayuti  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम? भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातून एकही उमेदवार नाही

Loksabha BJP Candidate List : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटपाबाबत एकमत होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.

प्रविण वाकचौरे

BJP Candidate List :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटपाबाबत एकमत होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. या सर्व जागांबाबत अद्याप बोलणी सुरु असल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोललं जातं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वीच जागावाटपाचा एका फॉर्म्युल्याची चर्चा होती. ज्यामध्ये भाजप २८, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी १० जागा लढेल, असं बोललं जात होतं. मात्र याबाबत महायुतीतील कोणत्याही नेत्यांने अधिकृत माहिती दिलेली नाही. (Latest Marathi News)

महायुतीमध्ये अनेक जागांवर रस्सीखेच सुरु आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अदलाबदल केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत कोण कोणत्या जागेवर लढणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी

काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना भाजपने उत्तरप्रदेशच्या जौनपूरमधून उमेदवारी दिली आहे. ते मूळ जौनपूरचेच आहेत. काही महिन्यांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते उत्सुक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT