Uddhav thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav thackeray : हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना पाठिंबा का दिला नाही? उमेदवार जाहीर करत उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Uddhav thackeray on raju shetti : बुधवारी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

Uddhav thackeray Latest news :

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु होती. काही दिवांपूर्वी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती. मात्र, आज बुधवारी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आज बुधवारी भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी काही जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली. या उमेदवारांच्या नावामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, ठाकरे गट हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र, राजू शेट्टी यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितलं होतं की, रितसर महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हा किंवा मशाल चिन्हावर निवडणूक लढवा. आम्ही तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. पण त्यांनी नाही म्हटलं'.

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी उद्धव ठाकरे म्हणाले,' आश्चर्यकारक आहे. मी प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही बोलणार नाही. त्यांचे आजोबा आणि माझे आजोबा देशासाठी एकत्र लढले आहेत. आता जरी जुळलं नसलं तरी पुढे जुळणार नाही असं नाहीये. प्रकाश आंबेडकर यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. संजय राऊत यांच्यावर त्यांनी आरोप केले पण ते खोटे आहेत. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. माझ्या लोकांना देखील सांगितलं आहे की, त्यांच्या विरोधात बोलायचं नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT