leopard trapped in loni and junnar  saam tv
मुंबई/पुणे

Leopard Trapped In Loni : लाेणीत सहावा बिबट्या जेरबंद, मांजरवाडीमधील बिबट्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. ग्रामस्थांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले हाेेते.

Siddharth Latkar

- राेहिदास गाडगे / सचिन बनसाेडे

Leopard News :

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (loni) परीसरात बिबट्यांनी (leopard) धुमाकूळ घातला हाेता. बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांना आपला जिव गमवावा लागला हाेता. बिबट्याला पकडण्यासाठी लोणी परिसरात जवळपास 18 पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यापैकी ब्राह्मणे वस्तीवरील एका पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील लोकवस्तीत देखल एक बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परीसरात दोन लहान मुलांचा जीव घेणा-या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. आत्तापर्यंत सहा बिबट्यांना (Leopard) जेरबंद केले गेले आहे. प्रवरा विद्यालयाजवळ असलेल्या ब्राह्मणे वस्तीवर एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे.

लोणी परिसरात जवळपास 18 पिंजरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे मागच्या एक महिन्यापासुन बिबट्याने शेळ्या मेंढ्यांवर हल्ले केले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली होते. उसाच्या शेताच्या बाजूला 4 दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आलेला होता. (Maharashtra News)

या पिंज-यात रात्रीच्या सुमारास 1 मोठा बिबट्या जेरबंद झाला आहे. वन विभागाने जेरबंद केलेला बिबट्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; संतापलेल्या महिलेनं थेट गिरीश महाजनांना सुनावलं| Video

फिश पॉलिटिक्स! मासे ठरवणार पश्चिम बंगालचा निकाल, Explained

पुण्यात टँकर माफियांचा सुळसुळाट, साम इन्व्हेस्टिगेशनमध्ये टँकर माफियांचा भांडाफोड

Maharashtra News Live Update: लातूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारपीट

SCROLL FOR NEXT