हा व्हिडीओ पाहा... बिबट्या परिजात इमारतीतील घरात घुसला... तरुणीवर हल्ला केलाय.. बिबट्याच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला अग्निशमन दलाने खिडकीचे तावदान तोडून बाहेर काढलंय...
आता बिबट्या थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वेशीवर नागरी वस्तीत धडकल्यानं नागरिक आणि प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत...तर एवढ्या गजबजलेल्या मिरा भाईंदरमध्ये बिबट्या कसा पोहोचला....यावरुन अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागलीय...
अखेर या दहशतीला थांबवत वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं....आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला...
खरंतर पुणे, अहिल्यानगर, नाशिकमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत आहे.... त्यातच नागपूरमध्येही बिबट्यामुळे प्रशासनाची धडकी भरली होती... आता बिबट्याने मुंबई प्रदेशातही धडक मारलीय... मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात राज्यात किती बळी गेलेत..
बिबट्यांच्या हल्ल्यात 2024 मध्ये 20 तर यंदा तब्बल 68 जणांचा बळी गेलाय... तर 150 पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत.. एवढंच नाही तर वर्षभरात 1500 जनावरांचा मृत्यू झालाय... बिबटयांचा प्रवास खेड्यापासून मोठ्या गावांपर्यंत होत असतानाच हे बिबटे आता थेट मोठ्या शहरात य़ेऊ लागले आहेत. नागपूरमध््ये तर थेट अधिवेशन काळात बिबट्या आला आणि आता मीरा भांईदर साऱख्या गजबजलेल्या वस्तीत..एवढ्या भरवस्तीत बिबटे कुठून येतात. त्याचा आता शोध घेऊन उपाययोजना करायला हव्यात... एवढंच नाही तर बिबट आणि मानव संघर्ष कायमचा संपवण्यासाठी बकऱ्या सोडणार किंवा इतर काही थातूर मातूर उपाययोजना कऱण्याऐवजी बिबट्यांची नसबंदीसोबतच त्यांच्या अधिवासाच्या जागा राखीव करायला हव्यात....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.