Leopard Attack  Saam tv
मुंबई/पुणे

Leopard Attack : कोंबडीचोर बिबट्या, रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी आला अन्...CCTV व्हिडिओ बघा

Leopard Attack on hen : बिबट्या रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी येऊन कोंबडी चोरली. कोंबडीचार बिबट्या सीसीटीव्हीत आढळला आहे.

Vishal Gangurde

राज्यभरातील विविध भागात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. जनावारांचं रक्त पिण्याची सवय लागलेल्या बिबट्यांचा मानवी वस्तीत घुसून कोंबड्या, शेळ्यांचा फडशा पाडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. बिबट्यांकडून लोकांवरही हल्ला केल्याचा घटना घडल्या आहेत. याच बिबट्याची दहशत पुण्यातील टाकेवाडीतही पाहायला मिळत आहे. प्राण्यांसहित लोकांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या कोंबडीवर झडप घालताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळला आहे. बिबट्या सीसीटीव्हीत आढळल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे गावात काही दिवसांपूर्वी बिबट्याने ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला केला होता. हल्ला करणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यास यश आलं आहे. त्यानंतर आता आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडीत बिबट्या आढळला आहे. बिबट्याच्या शिकारीमुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. या बिबट्याने प्राणी-पक्ष्यांवर हल्ले चढवणे सुरु केले आहेत. रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी शिरलेल्या बिबट्याने पाळीव जनावरांवर नाही तर कोंबड्यांवर हल्ला केला. यामुळे बिबट्या कोंबडी चोर बनलाय का, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडीत बिबट्याने आठवडाभरात दुसऱ्यांदा कोंबडी पळवून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या 'कोंबडी चोर बिबट्या'मुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे लोकांनी बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली.

नेमकं काय घडलं?

कोंबडी चोर बिबट्याची पुन्हा एकदा टाकेवाडीत जनावरांच्या गोठ्यात दाखल झाला. या बिबट्याने बंदिस्त असलेल्या या गोठ्यातून कोंबडी पळवून नेली. बिबट्याचा हा शिकारीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. या हल्लामुळे पाळीव जनावरांवर बिबट्याच्या हल्ल्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

थोरांदळेतील बिबट्या जेरबंद

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे परिसरात एका ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला करून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. थोरांदळे ग्रामस्थांच्या मागणीवरून वन विभागाने येथे लावलेल्या पिंजऱ्यात पाच ते सहा वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेत माणिकडोह बिबट निवारा केंद्राकडे सुपुर्द केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून दोन दिवस वाशिमच्या दौऱ्यावर

Infinix GT 30 5G+ स्मार्टफोन, 144Hz AMOLED डिस्प्लेसह दमदार फिचर्स आणि किंमत

HSRP Number Plate: उरले फक्त २४ तास! HSRP नंबरप्लेट बसवा अन्यथा भरावे लागणार १०,००० रुपये; ऑनलाइन प्रोसेस वाचा सविस्तर

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे उपाय अवश्य करा; अशुभ प्रभावातून मिळेल सुटका

Pakistan Vs India: पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेच्या अणुबॉम्बवर पाकच्या उड्या?

SCROLL FOR NEXT