leopard attack on 4 year old girl in wagholi pune District Saam TV
मुंबई/पुणे

Leopard Attack: आई-वडील शेतीकामात व्यस्त, ४ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याची झडप; थरकाप उडवणारी घटना

Pune Leopard Attack News: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात एक भयानक घटना घडली. शेतामध्ये खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १६ डिसेंबर २०२३

Pune Leopard Attack News

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात एक भयानक घटना घडली. शेतामध्ये खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. आई-वडिलांच्या नजरेसमोरूनच बिबट्याने चिमुकलीला ऊसाच्या शेतात फरफटत नेलं. सर्वांनी आरडाओरडा केली असता, बिबट्याने घटनास्थळावरून सोडून पळ काढला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी (१४ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास बुर्केगाव परिसरात घडली. दैव बलवत्तर म्हणून चिमुकली बिबट्याच्या तावडीतून सुटली. मात्र, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिच्या गळ्यावर, डोक्यात तसेच पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुनम दत्तात्रय चौरे (वय ४ वर्ष) असं जखमी चिमुकलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथे राहणारे दत्तात्रय चौरे आपल्या कुटुंबियांसोबत गुरुवारी शेतात काम करीत होते.

त्यांच्यापासून अंदाजे १० फूट अंतरावर चिमुकली पुनम खेळत होती. दरम्यान, काम करीत असताना त्यांना पुनमचा रडण्याचा आवाज आला. जेव्हा कुटुंबियांनी मुलीकडे बघितलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

आपल्या मुलीला बिबट्या उचलून ऊसाच्या शेतात घेऊन जात असल्याचं त्याचं लक्षात आलं. सर्वांनी आरडाओरडा केली असता, बिबट्याला मुलीला घेऊन पळता आलं नाही. त्याने तिथेच चिमुकलीला सोडून काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

SCROLL FOR NEXT