Leopard Attack Boy in Junnar Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल

Leopard Attack Boy: भयंकर! बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल

गोपाल मोटघरे

Leopard Attack Boy in Junnar

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मंगळवारी (१० ऑक्टोबर) एक भयानक घटना घडली. आळे गावातील तितर मळ्यात अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, विरह सहन न झाल्याने त्याच्या आईने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिल्पा भुजबळ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईचे नाव आहे. बिबट्याची वाढती संख्या आणि दहशतीविरोधात संताप व्यक्त करत या महिलेने आक्रोश केला. लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सुद्धा या महिलेने केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

शिवांश भुजबळ हा ४ वर्षाचा चिमुकला अंगणात खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्या शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. आरडाओरड झाली असता, एका तरुणाने मोठ्या हिंमतीने बिबट्याचा पाठलाग केला. त्याने शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवून आणलं.

जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना शिवांशचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवांशच्या मृत्युनंतर आळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

दुसरीकडे शिवांशच्या मृत्युने त्याची आई शिल्पा यांना जबर धक्का बसला. आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत असून वनविभागाच्या कारभारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT