Ghoradeshwar Caves, Ghoradeshwar Dongar, youth, maval news  saam tv
मुंबई/पुणे

Ghoradeshwar Caves : पाय घसरल्याने दीडशे फूट दरीत पडून युवकाचा मृत्यू; घोरावडेश्वर डोंगरावरील घटना

या घटनेचा अधिक तपास तळेगाव पाेलिस करीत आहेत.

दिलीप कांबळे

Ghoradeshwar Caves : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळ असलेल्या घोरावडेश्वर डोंगरावरून (Ghoradeshwar Dongar) पाय घसरून दीडशे फूट दरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. लक्ष्मण पुजारी असं मृत युवकाचे नाव आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार लक्ष्मण हा आपल्या मित्रांसोबत (friends) घोरावडेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. डाेंगरावर फिरत असताना अचानक लक्ष्मण याचा पाय घसरला. सुमारे दीडशे फूट असलेल्या दरीत लक्ष्मण कोसळला.

या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी तळेगाव पोलिसांनी (police) दिली. पाेलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पाेलिसांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या पथकास पाचारण केले.

दरीत पडलेल्या लक्ष्मण याला शोधण्यासाठी सर्वांना सुमारे साधारण दोन अडीच तास लागले. बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी दोरीच्या साह्याने दरीतून लक्ष्मणला बाहेर काढले. मित्रांना तो मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT