Gautami Patil saam tv
मुंबई/पुणे

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांसह तरुणींचा धुडघुस; कार्यक्रम बंद झाल्यानंतर तुफान हाणामारी

लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही.

रोहिदास गाडगे

Gautami Patil Latest News :  लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. गौतमी पाटील हिच्या खेड येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

गौतमी पाटीलचा (Gautami patil) कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पहायला मिळत असताना खेड (Khed) तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते.

यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. मात्र, त्यानंतर काही वेळातच तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली हा प्रकार इथच थांबला नाही तर या कार्यक्रमात ग्रामीण डोंगराळ भागातील तरुणीनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत कार्यक्रमात चांगलाच धुडगुस घातला.

यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यावेळी अखेर राजगुरुनगर पोलिसांनी (Police) मध्यस्थी करुन वाद मिटवला आणि त्यानंतर आयोजकांना कार्यक्रम संपल्याचं जाहिर करावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

SCROLL FOR NEXT