lathi charge on traders in pimpri chinchwad saam tv
मुंबई/पुणे

Lathi Charge On Traders In Pimpri Chinchwad : व्यापा-यांवर लाठीचार्ज, पिंपरीत तणाव; पाेलिसांची मध्यस्थी

lathi charge on traders in pimpri chinchwad

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Latest Marathi News : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी मार्केटमध्ये आज व्यापाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील शिपायांनी व्यापाऱ्यांवर (traders) सौम्य लाठीचार्ज केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. दाेन्हीकडून चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला. (Breaking Marathi News)

महापालिकेच्या अतिक्रमण (encroachment) विरोधी कारवाईला पिंपरी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण विराेधी पथकाच्या अधिका-यांची, कर्मचा-यांची आणि व्यापा-यांत शाब्दिक वाद झाला. हा वाद सुरु असतानाच अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षकांनी व्यापाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्याने चिडलेल्या व्यापाऱ्यांनी काही काळ पिंपरी मार्केट बंद ठेवलं.

त्यानंतर पोलिस (police) खाते, महापालिका प्रशासन यांच्याशी चर्चा करुन व्यापाऱ्यांनी मार्केट सुरू केले . महापालिका पाथरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी दुकानदारांवर कारवाई करत आहे असे व्यापाऱ्यांनी म्हणणे मांडलेे. तसेच लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी मार्केट असोसिएशनने केल्याची माहिती अध्यक्ष श्री. आसवांनी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Kadam : "पालकमंत्री व्हायचं असेल तर मुंबई-गोवा महामार्ग नीट करा" रामदास कदम यांच भरत गोगावले यांना आवाहन | VIDEO

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

SCROLL FOR NEXT