maharashtra government saam tv
मुंबई/पुणे

Police officers Transfer: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा लिस्ट

बिपीनकुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सूरज सावंत

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या यामध्ये समावेश आहे. या पोलीस अधिकाऱ्यामध्ये बिपीनकुमार सिंह, प्रभात कुमार, विनीत अग्रवाल, विनीत अग्रवाल, राजकुमार व्हटकर, जय जाधव, कैसर खालिद, डी के पाटील भुजबळ, एस एच महावरकर यांचा समावेश आहे.

बिपीनकुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रभात कुमार यांची उप महासमादेशक होमगार्डपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनीत अग्रवाल यांची म्हाडाच्या अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.  (Latest Marathi News)

राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथकेपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी जय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कैसर खालिद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी के पाटील भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तर नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी एस एच महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT