मुंबई/पुणे

Pune Crime News: "भाई चा" बर्थ डे, तलवारीने चौकात धिंगाणा; दणक्यात सेलिब्रेशननंतर पोलिसांनी केली अशी दशा, एकदा पाहाच

Birthday Celebration By Cutting Cake With Sword:हर्ष आनंद कदम आणि सनी सुभाष दीपक यांना अटक केली आहे तर इतर दोन जण हे अल्पवयीन तरुण आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यात टवाळ मुलं आणि गुंडगीरी जास्त प्रमाणावर वाढताना पहायला मिळत आहे. काही टवाळ मुलं एकत्र येत शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करतायत. गेल्या २ दिवसांपूर्वीच पुण्याच्या सहकारनगर परिसरात अशीच एक घटना घडली. काही तरुणांनी वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हुल्लडबाज तरुणांचा एक व्हिडिओ समोर आलाय. (Pune Birthday Celebration)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका तरुणाचा जंगी वाढदिवस साजरा करण्याचं काम सुरु आहे. या पार्टीला तरुणाचे सर्व मित्र उपस्थित आहेत. आनंद आणि उत्साह तसेच आपण तर भाई आहोत या विचाराने बर्थ डे बॉय थेट कारच्या टपावर बसलाय. इथे बसून मोठ्या तलवारीने त्याने आपल्या वाढदिवसाचा केक कापलाय.

केक कापतानाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. तसेच बर्थ डे बॉयला अटक केली आहे. त्याच्यासह अन्य ४ मित्रांच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. हर्ष आनंद कदम आणि सनी सुभाष दीपक यांना अटक केली आहे तर इतर दोन जण हे अल्पवयीन तरुण आहेत.

पोलासंनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. धनकवाडी येथे ही घटना घडली असून तरुणांनी अगदी रस्त्याच्या मधोमध म्हणजे भर चौकात उभे राहत तलवारीने केक कापला आहे. तसेच रस्त्यावर त्यांनी मोठा गोंधळही घातला. पुण्यातल्या (Pune) कोयता गँगला पोलिसांनी अटक केल्यानंतरही अशा अशा घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT