Lata Shinde Viral Video Twitter/@Baisaneakshay
मुंबई/पुणे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी जेव्हा 'ढोल' वाजवतात; पाहा भन्नाट Video

CM Eknath Shinde's Wife Lata Shinde Viral Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पत्नी लता शिंदे या खूपच आनंदी दिसतायत, त्या गुलालात रंगल्या असून ढोल वाजवत त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यासह मुंबईत जल्लोषाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि परिवाराने जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) ढोल वाजवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पत्नी लता शिंदे या खूपच आनंदी दिसतायत, त्या गुलालात रंगल्या असून ढोल वाजवत त्यांनी विजयोत्सव साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. लता शिंदे यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय. (CM Eknath Shinde's Wife Lata Shinde Playing Dhol)

हे देखील पाहा -

गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा केली. त्यानंतर ठाणे शहरातील शिंदे समर्थकांकडून एकच जल्लोष केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर समर्थकांनी ढोल-ताशाच्या गजरात फटके फोडत, पेढे वाटत जल्लोष व्यक्त केला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांमध्येदेखील आनंदाचे वातावरण पसरले होते.

एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ढोल-ताशांच्‍या गजरात, पेढे वाटप, फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन समर्थक थिरकत होते आणि शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करत होते. पाऊस सुरू असतानाही शिंदे समर्थकांचा जल्लोष अवर्णनीय होता. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनीही आपल्या पतीच्या विजयाचा आनंद मनसोक्तपणे सादर केला. बॅण्ड वाजत असलेल्या ठिकाणी जात त्यांनी स्वतः ढोल वाजवला. मिसेस मुख्यमंत्र्यांच्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोयय

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप, त्याचबरोबर आवाहनेदेखील करण्यात येत होती. त्यामुळे राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. आता, त्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. गुरुवारी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाण्यातील शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात केली आणि जल्लोष केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT