Sushil Kedia On Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Sushil Kedia On Raj Thackeray: मराठी भाषेच्या वादामध्ये आता उद्योजक सुशील केडिया यांनी उडी घेतली. त्यांनी थेट राज ठाकरे यांना टॅग करत सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरेंना खुल्लं आव्हान दिलं.

Priya More

मुंबईमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्याने आता राजकीय वादाचे रूप धारण केले आहे. मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरारोड-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता मराठीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू झाला आहे. या वादात आता उद्योजक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट राज ठाकरे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी दिली आहे. त्यांनी या पोस्टद्वारे मी मराठी शिकणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.

केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठी बोलण्याच्या वादामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना टॅग केले आहे.

केडिया यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मुंबईमध्ये ३० वर्षांपासून राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी व्यवस्थित समजत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते बोल?.'

मीरारोड येथील एका व्यापाऱ्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता उद्योजक केडिया यांचे हे खळबळजनक विधान समोर आले. त्यामुळे आता राजकारण पुन्हा तापले आहे. यावर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT