navi mumbai, crime news saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime News : महिलेचा निर्घृण खून; भाडेकरु पैसे, दागिने घेऊन पसार

या घटनेमुळे एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Crime News : उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील एका सत्तर वर्षीय महिलेचा खून झाला आहे. या खूनानंतर संबंधिताने महिलेच्या अंगावरील दागिने गायब केल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिस (police) या घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उरण तालुक्यातील बोकडविरा गावात ललिता ठाकूर या वृद्ध महिलेची तिच्याच घरात (house) भाडेकरू म्हणून राहणाऱ्या अमोल शेलार या संशयित आराेपीने हत्या केली. त्यानंतर ताे घराला कुलूप लावून पळून गेला.

या भाडेकरूने ललिता यांच्याकडून वीस हजार रुपये उसने घेतले होते. त्याच बरोबर ललिता यांच्या अंगावरील दागिने देखील गायब आहेत. यामुळे कपाटातील दागिने आणि पैसे देखील पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ललिता यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते तसेच घराला बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण केले. या घटनेमुळे एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT