Lalit Patil  Saam tv
मुंबई/पुणे

Lalit Patil Case : ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील किती पैसे मोजायचा? पोलीस तपासात समोर आलेला आकडा ऐकून डोळे पांढरे होतील

Pune Crime News : एवढी मोठी रक्कम ललित पाटील ससून रुग्णालयात नेमकी कुणाला देत होता? याचा तपास पोलीस करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

ड्रग माफिया ललित पाटीलच्या चौकशी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने अवैद्यरित्या किती संपत्ती कमावली याचे पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत. ड्रग्स प्रकरण अटक केल्यानंतर ललित पाटील वैद्यकीय कारण देत पुण्यातील ससून रुग्णालयात राहत होता. मात्र त्याठिकाणी तो फुकटात राहत नव्हता. त्यासाठी तो मोठी रक्क मोजत होता, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील दर महिना 17 लाख रुपये मोजत होता. पोलीस तपासात ही माहिती उघड झाली आहे. विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. ड्रग्स विक्रीच्या पैशातून ललित पाटील ससून रुग्णालय प्रशासनाला हे पैसे देत होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र एवढी मोठी रक्कम ललित पाटील ससून रुग्णालयात नेमकी कुणाला देत होता? ससून रुग्णालयात असताना ललित पाटील अनेक मॉल्स देखील फिरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Pune News)

५० लाखांच्य कार जप्त

ललित पाटीलच्या फॉर्च्युनरसह ३ कार पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ललित पाटील आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या मालमत्तांचा देखील शोध पोलिसांकडून सुरु आहे. ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून खरेदी केलेल्या प्लॉट तसेच फ्लॅटची माहिती पुणे पोलिसांच्या हाती आली आहे.

ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून स्वतःच्या नावे, कुटुंबियांच्या नावे, प्रेयसीच्या नावावर नाशिक शहर आणि जिल्ह्यात खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी पुणे पोलिसांच्या हाती. तर ललित पाटीलच्या जप्त केलेल्या ४ कारची किंमत तब्बल ५० लाख रुपयांच्या घरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT