Lalit Patil arrested by Mumbai Police  Saam tv
मुंबई/पुणे

Lalit Patil News: ललित पाटील प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण; अटक केलेल्या त्या दोन मैत्रिणी कोण?

Crime News: ललित फरार असताना सातत्याने या दोन्ही महिलांच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

Ruchika Jadhav

Lalit Patil:

अंमली पदार्थ तस्करीतला मास्टरमाईंड ललित पाटील प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अकट केलीये. दोघीही ललितच्या मैत्रिणी असल्याचे समजले आहे. ससून रुग्णालयातून त्याला पळून जाण्यासाठी महिलांनी मदत केल्याचे देखील समजलेय. (Latest Marathi News)

नाशिकमधून पुणे पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलंय. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावे आहेत. ललित फरार असताना सातत्याने या दोन्ही महिलांच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. अंमली पदार्थांप्रकरणी त्याने कमवलेले सर्व पैसे या दोन्ही महिलांकडे ठेवण्यासाठी दिले होते.

मुंबई पोलिसांनी बुधवारी ललितला ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला. पोलिसांनी रात्री नाशिक शहरातून दोघींनी अटक केली. पुणे न्यायलायात आज दोघींना हजर केले जाणार आहे. फरार असताना ललित नाशिकमध्ये या दोन्ही महिलांना भेटला. तसेच त्याने महिलांकडून पैसे घेतले. पुढे त्याला राहण्यासाठी आणि श्रीलंकेला पळून जाण्यासाठी या महिला मदत करत होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

ललित हा मूळचा नाशिकमधील आहे. तो एक्स्पोर्टचा व्यवसाय करायचा. ललितचा भाऊ भूषणला देखील पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामुळे ललितच्या आई वडिलांवर मोठा आघात झालाय. मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याता यावी त्यांचा एन्काउंटर करूनये, असं ललितच्या आई म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT