मुखदर्शन असो की चरणस्पर्श लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळमध्ये दाखल होत असतात... मात्र बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी सर्वसामान्य भक्त तासन्तास रांगेत उभे राहत धक्के हात असतानाच दुसरीकडे मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात व्हीआयपी संस्कृतीचा बोलबाला पाहायला मिळतो...
हा व्हिडिओ पाहा... महिला असो वा पुरुष....बॅरीगेड ओलांडून राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या भाविकांची ही गर्दी अक्षरशा: एकमेंकाला तुडवत पुढे सरकतेय...एकीकडे उद्योगपती, अभिनेते, क्रिकेटर आणि राजकीय नेते सावकाश बाप्पाचं चरणस्पर्श करत फोटो काढताना दिसतात..तर दुसरीकडे सर्वसामान्य भाविकांची अक्षरशा फरफट होते... व्हीआयपी दर्शनाच्या रांगेतही भाविकांची परिस्थिती वेगळी नाही...
एकीकडे भाविकांना मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करतात तर दुसरीकडे पोलिसांकडून अधिकृत पत्रकारांनाही कव्हरेज करण्यासाठी अडवणूक केली जाते...एका भाविकानं तर दर्शनासाठी बनावट ओळखपत्र बनवलं म्हणून त्याला पोलिसांकडे सुपूर्द करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी अक्षरशा गुन्हेगारासारखं मारलं....
व्हीआयपी रांगा, पोलिसांची पत्रकारांवरील मुजोरी बनावट ओळखपत्रांचा वाद आणि महिलांना होणारी धक्काबुक्की यामुळे यावर्षीही लालबागचा राजाची व्हीआयपी संस्कृती वादाचा मुद्दा ठरलीय... त्यामुळे घरीच बाप्पाच्या पाया पडा, आरती करा...... अन्यथा गर्दीत मोबाईल चोरी, धक्काबुक्की, तासनतास रांगेत उभे राहून हाल अपेष्टा आणि चक्कर येणं यासारख्या घटना घडतच राहतील...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.