Kurla Magistrat Court Crime Saamtv
मुंबई/पुणे

Kurla Crime News: धक्कादायक! आरोपीचा न्यायाधीशांनाच चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न; कुर्ला न्यायालयातील घटना

Kurla Magistrat Court Crime News: या आरोपीवर २०१६ व २०११ मध्ये ना म जोशी मार्ग, ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न व मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.

सुरज सावंत

Kurla News: कुर्ल्याच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपीने न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार (१, एप्रिल) ला न्यायालयीन कामकाज सुरू असताना हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे या ३९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे तायडेवर २०१६ व २०११ मध्ये ना म जोशी मार्ग, ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न व मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. याच गुन्ह्यात तारखेसाठी तायडेला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयात त्याने आपल्यावरील प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लावून कोर्टाच्या फेर्यातून मुक्त करावे ही मागणी करत आरडाओरड करू लागला.

त्याचवेळी प्रदिप तायडेने अचानक न्यायाधिशांच्या दिशेने पायातली चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी प्रदिप तायडेवर कुर्ला पोलिस ठाण्यात ३५३,३२८, १८९, ५०६, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत. (Kurla Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT